Day10: 16-May-23: Return Journey

सकाळी :५५ ची रिटर्न flight असल्याने पहाटे ला उठलो आणि ला खाली उतरलो . Breakfast सुरु झाला होता. त्यामुळे जे मिळेल ते , किंबहुना, जे पोटात जाईल ते खाऊन घेतले. बाहेर येऊन बस मध्ये बसलो, आणि १०-१५ मिनिटात बस एअर पोर्ट ला पोचली . सर्वांनी बस ड्राइवर फ्रँको चे आभार मानले आणि एअरपोर्ट च्या आत गेलो. Flight Ontime होती, आणि मुंबई ला वेळेवर पोचली . मुंबई एअरपोर्ट ला जसजसं सगळ्यांच सामान येत गेलं , तसं दिसतील त्या लोकांचा निरोप घेऊन लोक बाहेर पडू लागले . आम्ही निघालो आणि १५ मिनिटात घरी पोचलो .

टूर जरी संपली असली तरी त्याच्या आठवणी आयुष्यभर लक्षात राहतील अशा आहेत. Visa चं टेन्शन, आणि Innsbruck हॉटेल सोडलं तर टूर खरंच खूप छान झाली . मुख्य म्हणजे ग्रुप खूप छान होता. गाणी म्हणत, इन्स्पेक्टर साहेबांचे किस्से ऐकत, अंताक्षरी खेळत, मोठे मोठे प्रवास खूप छोटे वाटत होते. Overall ट्रिप छान झाली .

प्रवास वर्णनाची हि साठा उत्तरी कहाणी, "साठा " उत्तरी सुफळ संपूर्ण .

 

यूरोप चं हे प्रातिनिधीक चित्र .... ठेवूया आपल्या आठवणीत जपून  ......


 

Read Again 

Comments

Popular posts from this blog

Day0-Prologue

Day2: 8-May-23: Rome, Vatican

Day3: 9-May-23: Pisa