Posts

Day10: 16-May-23: Return Journey

Image
सकाळी ९ : ५५ ची रिटर्न flight असल्याने पहाटे ५ ला उठलो आणि ६ ला खाली उतरलो . Breakfast सुरु झाला होता . त्यामुळे जे मिळेल ते , किंबहुना , जे पोटात जाईल ते खाऊन घेतले . बाहेर येऊन बस मध्ये बसलो , आणि १० - १५ मिनिटात बस एअर पोर्ट ला पोचली . सर्वांनी बस ड्राइवर फ्रँको चे आभार मानले आणि एअरपोर्ट च्या आत गेलो . Flight Ontime होती , आणि मुंबई ला वेळेवर पोचली . मुंबई एअरपोर्ट ला जसजसं सगळ्यांच सामान येत गेलं , तसं दिसतील त्या लोकांचा निरोप घेऊन लोक बाहेर पडू लागले . आम्ही निघालो आणि १५ मिनिटात घरी पोचलो . टूर जरी संपली असली तरी त्याच्या आठवणी आयुष्यभर लक्षात राहतील अशा आहेत . Visa चं टेन्शन , आणि Innsbruck च हॉटेल सोडलं तर टूर खरंच खूप छान झाली . मुख्य म्हणजे ग्रुप खूप छान होता . गाणी म्हणत , इन्स्पेक्टर साहेबांचे किस्से ऐकत , अंताक्षरी खेळत , मोठे मोठे प्रवास खूप छोटे वाटत होते . Overall ट्रिप छान झाली . प्रवास वर्णनाची हि साठा उत्तरी कहाणी , " साठा " उ

Day9: 15-May-23: Mt. Titlis, Switzerland

Image
         आजचा टूर चा तसं म्हटलं तर शेवटचा दिवस होता . पण attraction लई भारी होतं . Mt.   Titlis . साधारण तासाभराच अंतर . पण हा प्रवास खास होता. Mt.   Titlis ला जाणारा हाच तो रास्ता, जिथे DDLJ मधील काही scenes शूट झाले होते.    अतिशय सुंदर रस्ता, दोन्ही बाजूंनी हिरवळ, मधून-मधून दिसणारी तुरळक घरे. प्रवास कधी संपला कळलंच नाही. लवकरच आम्ही Mt.   Titlis च्या पायथ्याशी म्हणजे Engelberg ला आलो . इथून पुढे १ केबल कार ने जावे लागते. अनिरुद्ध ने तिकिटे काढून आणली . तिकिटं सोबतच १ sticker हि चिकटवला . हा sticker जेवण्याच्या ठिकाणी पाहतील असे म्हणाला . sticker सांभाळायची नसती कटकट . असो.            केबल कार राईड सुरु झाली . बाहेर हलका हलका पाऊस सुरु होता.   त्यामुळे केबल कार च्या काचेवर पाण्याचे थेम्ब जमा होत होते. पण अचानक १ शोध लागला. या केबल कार ला १ छोटी खिडकी होती, आणि ती उघडताही येत होती. चांगले फोटो काढण्यासाठी का होईन, आम्ही ती खिडकी उघडली, आणि मस्तपैकी फोटो काढले . जसे जसे वर जात होतो, तसे छोटेसे Engelberg गाव सुंदर दिसत होते.     केबल कार ने पहिला Halt घेतला. पण येथे उतरायचे नव्हते .