Day9: 15-May-23: Mt. Titlis, Switzerland

       आजचा टूर चा तसं म्हटलं तर शेवटचा दिवस होता . पण attraction लई भारी होतं . Mt.  Titlis . साधारण तासाभराच अंतर . पण हा प्रवास खास होता. Mt.  Titlis ला जाणारा हाच तो रास्ता, जिथे DDLJ मधील काही scenes शूट झाले होते. 


 अतिशय सुंदर रस्ता, दोन्ही बाजूंनी हिरवळ, मधून-मधून दिसणारी तुरळक घरे. प्रवास कधी संपला कळलंच नाही. लवकरच आम्ही Mt.  Titlis च्या पायथ्याशी म्हणजे Engelberg ला आलो . इथून पुढे १ केबल कार ने जावे लागते. अनिरुद्ध ने तिकिटे काढून आणली . तिकिटं सोबतच १ sticker हि चिकटवला . हा sticker जेवण्याच्या ठिकाणी पाहतील असे म्हणाला . sticker सांभाळायची नसती कटकट . असो.  

 

 

 

 


केबल कार राईड सुरु झाली . बाहेर हलका हलका पाऊस सुरु होता.  त्यामुळे केबल कार च्या काचेवर पाण्याचे थेम्ब जमा होत होते. पण अचानक १ शोध लागला. या केबल कार ला १ छोटी खिडकी होती, आणि ती उघडताही येत होती. चांगले फोटो काढण्यासाठी का होईन, आम्ही ती खिडकी उघडली, आणि मस्तपैकी फोटो काढले . जसे जसे वर जात होतो, तसे छोटेसे Engelberg गाव सुंदर दिसत होते.  


 

केबल कार ने पहिला Halt घेतला. पण येथे उतरायचे नव्हते . असेच अजून वर गेलो आणि दुसऱ्या स्टेशन ला उतरलो . इथे प्रत्येक केबल कार वर एका देशाचा झेंडा लावला आहे. संपूर्ण प्रवासभर तनिष आणि अथर्व दिसलेला प्रत्येक झेंडा कोणत्या देशाचा यावरून timepass करत होते. भारताचा झेंडा दिसताच खूप छान वाटले .

 

 

गेल्या गेल्या Ice Cream मिळणार होत . पण पंकज ग्रुप मध्ये घुसला आणि त्यांनी नुसता chaos करून टाकला. काल पासून वात आणला होता या लोकांनी . Ice cream खाल्लं  आणि आम्ही पळालो Ice plateau कडे. बराच सपाट प्रदेश होता, आणि त्यावर प्रचंड प्रमाणात snow जमा झाला होता. हलका हलका Snowfall सुद्धा होत होता . आज शिल्पा plateau पर्यंत आली होती. आम्ही तिघांनीही snowfall चा आनंद घेतला.

यश चोप्रांची कृपा - इथे शाहरुख आणि काजोल चं DDLJ पोज मधलं १ permanent poster लावलेलं आहे. आणि जवळजवळ सर्व भारतीय जोडपी तशाच पोज मध्ये तिथे फोटो काढून घेत होती. त्यांच्यात आम्हीही !!! अजून पुढच आकर्षण होतं Ice Flyer राईड . साधारण २०० मीटर अंतर चालल्यावर अजून १ छोटी राईड होती. ही १ open केबल कार आहे . एवढ्या उंची वर , Snowfall होत असताना अशा राईड वर बसणं म्हणजे १ जबरदस्त अनुभव होता . मी, तनिष , Mr & Mrs तेंडोलकर, आणि निशांत असे आम्ही ५ जण बसलो . Ride सुरु झाली आणि अस वाटू लागला जणू काही आम्ही ढगांमध्ये उडतो आहोत . खाली किंवा आजूबाजूला फारस काही दिसत नव्हत. जिथे नजर पोचेल तिथे फक्त बर्फ , बर्फ आणि बर्फ . हि राईड संपली आणि पुढे होतं Cliff Walk . हा १ suspension ब्रिज आहे. पण एव्हाना थंडी प्रचंड वाढल्यामुळे आम्ही तिथून निघायचं ठरवलं .

थोडं shopping केलं आणि परतीच्या प्रवासास निघालो . निघण्याआधी सर्वांनी मिळून अनिरुद्ध ला १ Guard of Honour दिला . खरंच त्यानी एकट्याने हि टूर चांगली manage केली . केबल कार ने १ स्टेशन खाली आलो Trubsee येथे . इथल्या रेस्टॉरंट मध्ये जेवणाची व्यवस्था होती . Spice Bistro ह्या Indian रेस्टॉरंट मध्ये गेलो . इथला special मेनू होता पावभाजी आणि गाजर का हलवा . जेवण छान होतं . जेवण करून एक स्टेशन खाली आलो आणि गरम गरम मसाला टी मिळाला . 


                    चहा घेऊन बस निघाली , आणि पोचली Lucern शहरात .तिथे first Attraction होतं Lion Monument . पण तिथे सध्या काम चालू आहे. त्यामुळे फोटो चे फोटो काढले, थोडासा इतिहास ऐकला आणि पुढे निघालो . बस ने शॉपिंग एरिया मध्ये सोडले . तब्बल २ तास होते शॉपिंग करायला. आमची बरीचशी जनता "Casagrande Souvenirs" या शॉप मध्ये गेली . आम्ही आम्हाला हवी असलेली सर्व चॉकलेट्स इथेच खरेदी केली आणि बाहेर पडलो 

  

सर्वप्रथम Chapel Bridge ला गेलो . हा एक खूप जुना, लाकडाचं नक्षीकाम असलेला ब्रिज आहे. ब्रिज वर चालताना आजूबाजूच्या छान छान बिल्डींग्स , लेक चं निळंशार पाणी, खूप सुंदर दिसत होतं . जवळच १ कारंज होत . तेथे बसलो . एव्हाना पाय थोडे दुखू लागले होते. केसरी ने दिलेल्या फूड पॅकेट्स मधली भेळ काढून खाल्ली आणि बर वाटलं .  खाऊन Credit Suisse च्या बिल्डिंग च्या समोर ठरलेल्या Meeting point शी पोचलो . बराचसा ग्रुप already पोचलेला होता .

 


आता शिल्लक होतं टूर च शेवटच attraction :- Dinner cruise on Lake Lucerne. बरोबर ६:३० ला cruise सुरु झाली . Cruise वर दोन खूप वयस्कर लोकल कलाकार होते. त्यातील एका कलाकाराने Alphorn नावाचे प्रसिद्ध स्विस वाद्य वाजवून दाखवले. साधारण आपल्या तुतारी सारखे असते, पण लांबी ला खूप मोठे . मीही वाजवायचा प्रयत्न केला . नंतर डिनर सुरु झाला - संध्याकाळी ७ वाजता !!! गंमत अशी, कि त्याच वेळी संपूर्ण वातावरण मोकळं झालं , आणि चक्क सूर्यप्रकाश पडला . सूर्यप्रकाशात रात्रीचं जेवण घेण्याचा पहिलाच प्रसंग होता ! जेवण झाल्यावर १० मिनिटे बोटीच्या वरच्या भागात Music लावून काही जण थिरकले . थोडंसं फोटो सेशन झालं आणि बघता बघता बोट परत किनाऱ्याला लागली.

साधारण तासाभराच्या ड्राईव्ह नंतर बस झुरिक येथे हॉटेल ला पोचली . Movenpick Hotel Zurich-Airport.  उद्या पहाटे पाचला उठायचे असल्याने लवकर झोपी गेलो .

 

                    Moment of the day:-


 

 Day10

 

    

 

Comments

Popular posts from this blog

Day0-Prologue

Day2: 8-May-23: Rome, Vatican

Day3: 9-May-23: Pisa